मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांनी आज शुक्रवारी संभाजी ब्रिगेड संघटनेशी Shivsena Sambhaji Brigade Organization Alliance युती केली आहे. याच मुद्यावरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navneet Rana criticized Uddhav Thackeray यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray कोणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाही. त्यांच्यामध्ये दम नाही. तसे असते तर ते घरी बसले नसते, अशी खोचक टीका खासदार नवनीत राणा Mp Navneet Rana यांनी केली आहे. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.
'उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही' :माझे आणि उद्धव ठाकरेंचे व्यक्तीगत काही वाद नाही. शिवसेनेत बंड करून जे आमदार बाहेर पडले आहेत. ते स्वत:च्या हिंमतीवर बाहेर पडले आहेत. त्यांनी काही ना काही नाव कमवले आहे. संभाजी ब्रिगेडबाबत सर्वांच्या मनात आदर आहे. परंतु उद्धव ठाकरेंमध्ये दम नाहीये, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्यात दम असता तर घरी बसले नसते, अशी टीका खासदार नवनीत राणांनी केली आहे.