मुंबई -कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही विरोध झाला तरी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच सांगत खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे आग्रही झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री ( Chief Minister Uddhav Thackeray Matoshri residence ) या निवासस्थाना बाहेर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa reading ) करण्याचा इशारा खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा ( MP Navneet Rana and MLA Ravi Rana ) यांनी दिल्याने आता हा संघर्ष ( Navneet Rana Vs Shivsena ) पेटलेला आहे. या संदर्भामध्ये मुंबई पोलिसांनी 149 ची नोटीसही रवी राणा यांना बजावली असली तरी या नोटिशीला झुगारून रवी राणा यांनी उद्या (शनिवारी) सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाण्याचा निर्धार केला आहे. त्याचबरोबर अमरावतीमधील त्यांच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी मुंबईत येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याबाबत बोलताना खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा शिवसेनेवर व विशेषकरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) यांच्यावर हल्लाबोल करत, संजय राऊत हे पोपट असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील खार येथील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
'संजय राऊत फक्त पोपटासारखी बडबड करतात' : संजय राऊत हे पोपट आहेत. दररोज सकाळी पत्रकारांना जमा करून ते बडबड करत असतात. गोव्यात शिवसेनेला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली. आता महाराष्ट्रात देखील शिवसेनेची गोव्या सारखीच परिस्थिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवसैनिक आमचे काही वाकडे करू शकत नाही, त्यांनी आम्हाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असे म्हटले होते. तरी सुद्धा आम्ही मुंबईला आलो. आता उद्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.