महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MP Chikhlikar on Suspension Development Work: पेराल तेच उगवते!, खासदार चिखलीकरांचे विकास कामांच्या स्थगितीला समर्थन - MP Chikhlikar on Suspension Development Work

शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्ता स्थापन केल्याबरोबर डीपीडीसीच्या माध्यमातून मंजुरी दिलेल्या अनेक कामांना स्थगिती दिली आहे. ही स्थगिती योग्य असल्याचे मत नांदेडचे भाजपाचे खासदार प्रतापराव चिखलीकर ( MP Prataprao Patil Chikhalikar ) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Prataprao Patil Chikhlikar
प्रतापराव पाटील चिखलीकर

By

Published : Jul 9, 2022, 5:14 PM IST

मुंबई -शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्ता स्थापन केल्याबरोबर महाविकास आघाडी सरकारने डीपीडीसीच्या माध्यमातून मंजुरी दिलेल्या अनेक कामांना स्थगिती दिली आहे. ही स्थगिती योग्य असल्याचे मत नांदेडचे भाजपाचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

प्रतापराव पाटील चिखलीकर

जसे पेरावे तसे उगवते -राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ( Shinde Fadnavis Government ) सत्तेत आले आहे हे सरकार सत्तेत येताच नांदेडमधील डीपीडीसीच्या अनेक विकास कामांना स्थगिती ( Stop DPDC development works ) दिली आहे. मात्र या सरकारची ही कृती समर्थनीय आहे. कारण महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले असताना त्यांनीही सत्तेत येतात फडणवीस सरकारच्या अनेक कामांना स्थगिती दिली होती. मात्र, सत्तांतराच्या या खेळात नाहक जनता भरडली जाते. याबाबत आपले काय मत आहे? असे विचारले असता जसे पेरावे तसे उगवते महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारने सुद्धा हेच केले होते. असे लंगडे समर्थन भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

चव्हाण यांचे विकासाचे दावे फोल -नांदेडचे तत्कालीन पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी अनेक प्रकल्प सुरू केल्याचे आणि रस्ते दुरुस्त केल्याचे दावे केले आहेत. मात्र हे दावे खोटे आहेत. नांदेड मधल्या रस्त्यांची आजही दुरवस्था आहे. केवळ पैसे लागण्यासाठी दुरुस्तीची कामे दाखवली जातात असा आरोप चिखलीकर यांनी केला आहे. कोरोना काळात राज्य सरकारने केवळ एक ऑक्सिजन प्लांट नांदेडमध्ये उभारला. मात्र केंद्र सरकारने दोन ऑक्सिजन प्लांट नांदेडमध्ये उभारल्याचा दावाही चिखलीकर यांनी केला आहे. नांदेडमधील एका रेल्वे मार्गाच्या कामाबाबत अशोक चव्हाण जरी श्रेय घेत असले तरी त्या कामाबाबत आपण वारंवार संसदेत आवाज उठवला आणि म्हणूनच ते मार्गी लागत असल्याचेही चिखलीकर यांनी सांगितले.

विश्वासमता दरम्यान गैरहजर राहिल्याबाबत चव्हाण यांचे आभार -विधिमंडळात नुकत्याच झालेल्या विश्वास मत दर्शक ठरावा दरम्यान नांदेडचे आमदार अशोक चव्हाण आणि त्यांचे काँग्रेसचे अन्य सहकारी आमदार हे सभागृहात हजर नव्हते. त्यांनी दरवाजे बंद झाल्यामुळे आत जाता आले. नाही असे जरी कारण दिले असले तरी ते गैरहजर राहिल्याबद्दल भाजपच्यावतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. असा टोलाही यावेळी चिखलीकर यांनी लगावला.

हेही वाचा -Cm Eknath Shinde Statement : आम्हीच खरी शिवसेना, लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले - एकनाथ शिंदे

ABOUT THE AUTHOR

...view details