महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खासदार भावना गवळींचे शिवसेना पक्ष प्रमुखांना पत्र.. बंडखोरांवर कारवाई न करण्याची केली विनंती - yavatmal MP Bhavana Gawali

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ( MP Bhavana Gawali letter to cm uddhav thackeray ) राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र, बंडखोरी केलेले शिवसेनेचे आमदार ( MP Bhavana Gawali letter to cm over rebel mla ) असल्याने त्यांच्यावरती कारवाई करण्यात येऊ नये, अशा मागणीचे पत्र खासदार भावना गवळी ( MP Bhavana Gawali letter ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

MP Bhavana Gawali letter to cm uddhav thackeray
उद्धव ठाकरे यांना भावना गवळी यांचे पत्र

By

Published : Jun 23, 2022, 6:58 AM IST

यवतमाळ -शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ( MP Bhavana Gawali letter to cm uddhav thackeray ) राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असणाची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप आला आहे. मात्र, बंडखोरी केलेले शिवसेनेचे आमदार ( MP Bhavana Gawali letter to cm over rebel mla ) असल्याने त्यांच्यावरती कारवाई करण्यात येऊ नये, अशा मागणीचे पत्र यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी ( MP Bhavana Gawali letter ) यांनी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

पत्र

हेही वाचा -Complaint against Cm Thackeray : कोविड गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार

काय लिहिले आहे पत्रामध्ये? -आपल्या नम्रपणे निवेदन करते की, सद्यस्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थीतीमुळे आपण व्यतीथ झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आलेल्या संकटामुळे आपणासमोर खुप मोठे आव्हाण असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनातही याची खंत आहे. आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीन असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा, हीच नम्र विनंती. असे भावना यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) यांनी भावनिक आवाहन करूनही शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray) माघारी येण्यास तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतेवेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांना याबाबत आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये पूर्वीच सूचना दिली होती.

शिवसैनिक भावूक - सगळेच कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले होते. शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर फुलांचा वर्षाव केला. मुख्यमंत्रीही शिवसैनिकांचे प्रेम पाहून गलबलून गेले. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले होते. त्यांनी शिवसैनिकांचे अभिवादन स्वीकारत गर्दीतून वाट काढली आणि गाडीत बसून मातोश्रीच्या दिशेने निघून गेले. यावेळी त्यांच्याबरोबर पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील होत्या.

शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणा - मुख्यमंत्री रात्री साडे नऊच्या आसपास वर्षा बंगल्याच्या बाहेर पडले. त्यांच्या सन्मानासाठी बंगल्याबाहेर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, दीपाली सय्यद यांच्यासह अनेक सेना पदाधिकारी उपस्थिती होती. सगळ्यांनी आपल्या हातात असलेल्या फुलांचा वर्षाव मुख्यमंत्र्यांवर केला. यावेळी शेकडो शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या. घोषणांनी वर्षा बंगल्याचा परिसर दुमदुमून गेला होता. शिवसैनिकांचे प्रेम पाहून उद्धव ठाकरेंना देखील गलबलून आले.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : 'तशी परिस्थिती आल्यास विरोधात बसायला तयार', अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details