मुंबई- गडचिरोलीत झालेला नक्षलवादी हल्ला हा भाजप सरकारच्या मवाळ भूमिकेचाच परिणाम असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्लाचा तीव्र शब्दात निषेध केला.
खासदार चव्हाण पुढे म्हणाले, की महाराष्ट्रात गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकारही राहिलेला नाही. नक्षलवाद्यांनी एवढा मोठा हल्ला करेपर्यंत गृहविभाग काय करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यांनी तत्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.