मुंबई -"दुर्दैवाने महाराष्ट्रात सर्व असंविधानिक काम सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवायला हवे होते. आपण कोणी पाहिले का की, राज्यपालांनी अशा एखाद्या पक्षाला बोलावले. यांनी कुठे असा ठराव केलाय का की, आम्ही पक्षाबाहेरील व्यक्तीला मुख्यमंत्री करतोय. मग तुम्ही एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापनेसाठी कोणत्या अधिकारात बोलावले, त्यांना कोणत्या पक्षाचे नेते म्हणून तुम्ही बोलावले ?" असा असावा खासदार अरविंद सावंत ( MP Arvind Sawant ) यांनी उपस्थित केला आहे. आजच्या अध्यक्षपदाच्या मतदानावरही त्यांनी शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. या सर्व आमदारांनावर कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती सावंत यांनी दिली.
ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई त्यांनीच शपथ घेतली -खासदार सावंत म्हणाले की, "शिवसेना आपल्या पद्धतीने कायदेशीर लढाई लढत आहे. सुरुवातीला 12 नंतर 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत नोटीस देण्यात आली. त्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालय न्यायालयापर्यंत गेलेलो आहोत. न्यायालयाने अकरा तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे. असे असताना ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करायची आहे अशांनी आज शपथ घेतली आहे. हे कसे संविधानिक आहे हेच आम्हाला कळत नाही."