मुंबईशिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा आज MP Arvind Sawant on vinayak mete accident मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल नजिक अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण Vinayak mete accident news राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विनायक मेटे यांचे पार्थिव पनवेलहून मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
Arvind Sawant on vinayak mete अरविंद सावंत यांनी विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशीची मागणी करत घातपाताची शंका व्यक्त केली
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा आज मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर MP Arvind Sawant on vinayak mete accident पनवेल नजिक अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुर्दैवी vinayak mete accident news मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
विनायक मेटे यांचा अचानक अपघाती मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. अचानक झालेला या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. या अपघातामध्ये घातपात आहे का? अशी शंकाही अरविंद सावंत यांनी व्यक्त केली. जे.जे. हॉस्पिटलच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही शंका व्यक्त केली आहे.
राज्यामध्ये नुकतीच मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राज्यामध्ये सत्तांतर झाले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आले. मात्र, एवढी मोठी घडामोड होऊनही विनायक मेटेंसारख्या मोठ्या नेत्यांनी या सर्व प्रकरणात चकार शब्दही काढला नाही. याबाबत त्यांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही. आणि अचानक काल त्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आले. येताना दुर्दैवी अपघात झाला. त्यामुळे, यामागे घातपात तर नाही ना, अशी शंका अरविंद सावंत यांनी उपस्थित केली.