महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Har Har Mahadev Movie : 'हर हर महादेव' चित्रपटात गुंजणार राज ठाकरेंचा आवाज - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

चित्रपट हर हर महादेवमध्ये (Har Har Mahadev Movie) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी आणि हिंदी भाषेकरिता व्हाॅईस ओव्हर करुन आपला आवाज (Raj Thackeray has given his voice over) दिला आहे.

Har Har Mahadev Movie
चित्रपटात गुंजणार राज ठाकरेंचा आवाज

By

Published : Oct 17, 2022, 3:41 PM IST

मुंबई : दिवाळीत प्रदर्शित होणारा चित्रपट हर हर महादेव (Har Har Mahadev Movie) सध्या चर्चेत आहे. त्या चित्रपटात एक अनोखा आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. सह्याद्री पर्वताने छत्रपती शिवाजी महाराजांना घडताना पाहिलेय. त्यामुळे हर हर महादेव या चित्रपटात सह्याद्री सिनेमाची कथा कथन करणार आहे आणि त्या सह्याद्रीचा आवाज आहे, राज ठाकरे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेत एकाचवेळी प्रदर्शित होणार आहे. त्यातील मराठी आणि हिंदी (Marathi and Hindi languages) साठी राज ठाकरे यांनी आपला आवाज (Raj Thackeray has given his voice over) दिला आहे. त्यांनी तब्बल १७ दिवस डबिंग केले आणि तेही दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचे समाधान होत पर्यंत. महत्त्वाचे म्हणजे राज यांनी एकदाही तक्रार न करता सीन्स चे डबिंग केले.


जो या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे आणि त्याने शिवस्मरण करीत राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली. राज ठाकरे म्हणाले, 'फिल्म मेकिंग याची मला कॉलेज जीवनापासून आवड आहे. त्याहीपेक्षा शिवाजी महाराज हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सिनेमा हे कोलाबोरेटीव माध्यम आहे आणि मीदेखील याचा छोटासा भाग बनलो याचा मला आनंद आहे. मला माझे मित्र अजित भुरे यांनी खूप मदत केली. मी यापूर्वी एकदा व्हॉईस ओव्हर दिला होता आणि त्यावेळी बाळासाहेबांनी मला सेनेच्या नऊ जाहिरात फिल्म्सना आवाज देण्यास सांगितले. शिवाजी महाराज हा विषय माझ्याप्रमाणेच अनेकांना प्राणप्रिय आहे. इतिहासात डोकावून पाहिले तर असे समजते की, औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायला होता. त्याला वाटत होते तो हा विचार जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत त्याचा विचार तो या महाराष्ट्राच्या मातीत रुजवू शकणार नाही.'



'शिवाजी महाराजांचा मोठ्ठा पुतळा बनविण्यापेक्षा तेच पैसे महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनावर खर्च केले तर, पुढील पिढीला महाराजांबद्दल कळू शकेल. शिवाजी महाराज जर सर्वांना कळले तर महाराष्ट्राची प्रगती होईल' असेही राज ठाकरे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details