मुंबई-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार या दोघांमध्ये वेळोवेळी वाद झालेले समोर आले आहे. राज्य सरकारच्या कामकाजामध्ये राज्यपाल ढवळाढवळ करत असल्याचा वेळोवेळी आरोप राज्य सरकारकडून करण्यात आलाय. आता राज्य सरकारकडून राज्यपालांचे काही अधिकार कमी करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
कुलपती म्हणून राज्यपालांचे अधिकार कमी करण्यासाठी आघाडी सरकारची हालचाल? - महाराष्ट्र सरकार
राज्य सरकारच्या कामकाजामध्ये राज्यपाल ढवळाढवळ करत असल्याचा वेळोवेळी आरोप राज्य सरकारकडून करण्यात आलाय. आता राज्य सरकारकडून राज्यपालांचे काही अधिकार कमी करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करून विद्यापीठ बाबतीत राज्यपालांचे कुलपती म्हणून असलेले अधिकार कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्याचे कुलपती म्हणून विद्यापीठांमध्ये कुलगुरू नेमण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. 2016 च्या विद्यापीठ संचालन महाराष्ट्र सार्वजनिक कायदा अंतर्गत हे अधिकार राज्यपालांना आहेत. मात्र, आता या कायद्यात बदलासंदर्भात राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठकही घेतली आहे. या बैठकीत विद्यापीठासाठी दोन प्रकुलगुरू निवडी संदर्भात चर्चा झाली.
कुलगुरू निवड समितीत राज्य सरकारकडून अजून एक किंवा दोन प्रतिनिधी असावेत, या मुद्द्यावर देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्याच्या कायद्यानुसार कुलगुरू निवड संदर्भात राज्यपालांचा निर्णय बंधनकारक असतो. राज्यात एकूण 25 विद्यापीठे आहेत. त्यातील काही विद्यापीठात कुलगुरू बदलेले जाणार आहेत. त्यामुळे राज्यसरकार राज्यपालांचे अधिकार कमी करण्यासाठी हालचाली करत आहे.