मुंबई - काळाचौकी परिसरातून तीन महिन्याचे बाळ चोरी गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या बाबत तपास करत असताना पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासा उघड केला आहे. मोलकरणीने आपले बाळ पळवून नेले असा बनाब बनवत तीन महिन्याच्या मुलीचा स्वतः आईनेच खून ( Mother Kills baby in Mumbai ) केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेने मुलगी नको म्हणून तीन महिन्याच्या मुलीची हत्या केली आहे, असे कारण सांगितले आहे.
मुलगीच नको म्हणून चिमुकलीची हत्या -
क्रुरकर्मा आईने चिमुकलीची हत्या करुन तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला होता. लेकीची हत्या करुन तिचे अपहरण झाल्याचा बनाव आरोपी आईने केला होता. आरोपी आईचे नाव सपना मगदूम असे आहे. मुलगीच नको म्हणून चिमुकलीची हत्या केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी सखोल तपास करण्यास सुरुवात केली आहे.
असा केला होता बनाव -
आरोपी आईने आपल्या मुलीची हत्या करुन तिचे अपहरण झाल्याचा खोटा बनाव केला होता. महिलेने तक्रारीत भांडी विकणाऱ्या महिलेनेच माझ्या मुलीला पळवल्याचे म्हटले होते. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास एक 30 ते 35 वर्षाची महिला आली आणि जुन्या मोबाईलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचा सांगून आरोपी महिलेने सपना मगदूम यांचा विश्वास संपादन केला. जुना मोबाईल आणण्यासाठी सपना मखदूम जेव्हा आतल्या रूममध्ये जात होत्या तेव्हा भांडी विकणारी महिला मागून आली आणि तिने बेशुद्ध करण्याचे औषध सपना यांच्या नाकाला लावले. त्यानंतर पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या चिमुकलीला या महिलेने उचललं आणि आपल्या सोबत घेऊन पसार झाली असा दावा चिमुकलीची हत्या करणाऱ्या आईने केला होता.
नेमकं काय घडलं ?
मुंबईतील काळाचौकी परिसरात 30 नोव्हेंबर रोजी एक धक्कादायक घटना घडली होती. एका आईने आपल्या तीन महिन्याच्या मुलीचे भांडी विकणाऱ्या महिलेने अपहरण केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली होती. गायब असलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. मात्र दोन दिवसात या अपहरण प्रकरणाला वेगळे मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच पोटच्या मुलीचा खून केला आहे. मुलगी नको होती म्हणून आईने हे अमानुष कृत्य केलं आहे. विशेष म्हणजे मुलीचा खून करुन या आईने तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला होता. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आता मुलीचा मृतदेह सापडला आहे.
हेही वाचा -Young Man Commit Suicide in Nanded : 'माझ्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना त्रास देऊ नका' म्हणत सोशल मीडियावर पोस्ट टाकून तरुणाची आत्महत्या