मुंबई -अंधेरी पोलीस स्टेशनच्या ( 19 Year Old Girl Murder By Mother ) हद्दीत आईने आपल्या 19 वर्षाच्या मतिमंद मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आईने मुलीची हत्या केल्यानंतर पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मुलीच्या आत्महत्येचा बनाव रचला. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आईला अटक केली आहे.
आजारपणाचा खर्च परवडत नसल्याने हत्या -अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पारशीवाडा परिसरात ही घटना घडली असून परिसरात या घटनेमुळे संतापाचे वातावरण आहे. 41 वर्षीय महिला अनेक वर्षापासून आपल्या मतिमंद मुलीसोबत रहात होती. मात्र मुलीच्या आजापणाचा खर्च आणि तिची देखभाल याने महिला त्रस्त होती. यातूनच आईने स्वतःचं मनोरुग्ण मुलीचा पट्याने गळफास लाऊन हत्या केली. विशेष म्हणजे हत्येनंतर आईनेच मुलीला गळफास लावून तिने आत्महत्येचा बनाव रचला. तसेच मुलीच्या आत्महत्येची माहिती कंट्रोल रुमला देत पोलिसांना पाचरण केले.