महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक..! आईनेच नवजात बाळाला 17व्या मजल्यावरून फेकले - mumbai news

कांदिवली परिसरातील भारत हौसिंग सोसायटी इमारतीच्या 17 मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने नुकताच बाळाला जन्म दिला होता. आपल्या पतीसोबत झालेल्या भांडणानंतर रागावलेल्या महिलेने तिच्या बाळाला बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिले

mumbai
बाळाला 17व्या मजल्यावरून फेकले

By

Published : Dec 6, 2019, 8:01 AM IST

मुंबई- कांदिवली परिसरात खळबळजनक घटना समोर आली आहे. नुकत्याच जन्मलेल्या नवजात अर्भकाला त्याच्या आईनेच इमारतीच्या सतराव्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ माजली आहे.


कांदिवली परिसरातील भारत हौसिंग सोसायटी इमारतीच्या 17 मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने नुकताच बाळाला जन्म दिला होता. आपल्या पतीसोबत झालेल्या भांडणानंतर रागावलेल्या महिलेने तिच्या बाळाला बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांना सूचना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत जखमी बाळाला नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबाची माहिती उघड केली नसून अधिक तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details