महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Police Arrested Vikrant Deshmukh: मोस्ट वॉन्टेड विक्रांत देशमुखला मुंबई पाेलिसांकडून गोव्यात अटक - मोस्ट वाँटेड आरोपी विक्रांत देशमुखला गोव्यातून अटक

मुंबईतील मोस्ट वाँटेड आरोपी विक्रांत देशमुख उर्फ विक्कीला ( Mumbai Police Arrested Accused Vikrant Deshmukh ) पणजी पोलिसांनी उत्तर गोव्यातून शनिवारी रात्री उशिरा अटक केली. विक्रांत विरोधात महाराष्ट्र राज्यात एकूण 33 हून अधिक गंभीर गुन्हे नोंद आहेत.

Accused Vikrant Deshmukh arrested by Mumbai Police
आरोपी विक्रांत देशमुखला मुंबई पोलिसांकडून अटक

By

Published : Jul 31, 2022, 7:26 PM IST

मुंबई-मुंबईतील मोस्ट वाँटेड आरोपी विक्रांत देशमुख उर्फ विक्कीला ( Mumbai Police Arrested Accused Vikrant Deshmukh ) पणजी पोलिसांनी उत्तर गोव्यातून शनिवारी रात्री उशिरा अटक केली ( Panaji Police Arrested Accused Vikrant Deshmukh )आहे. दत्तात्रेय देशमुख याच्या पणजी येथील कॅसिनो परिसरातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्याचा एक सहकारी पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिस त्याच्या मागावर आहेत. विक्की आपल्या पूर्ण कुटुंबासोबत गोव्यात आला असताना (Accused Vikrant Came in Goa ) पोलिसांच्या जाळ्यात ( Accused Vikrant Deshmukh arrested in Goa ) सापडला. पणजी पोलिसांनी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाच्या समन्वयाने ही कारवाई केली.

विक्रांत राज्यात एकूण 33 हून अधिक गंभीर गुन्हे- विक्रांत उर्फ विक्की विरोधात महाराष्ट्र राज्यात एकूण 33 हून अधिक गंभीर गुन्हे नोंद आहेत. सध्या नेरुळ येथे खून आणि मोक्का प्रकरणात पोलिसांना त्याचा ताबा हवा आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिलेल्या माहिती नुसार, विक्की कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये उतरला होता. काल तो पणजी येथील कॅसिनोमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पणजीचे पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक मयूर पणशीकर, पोलिस कॉन्स्टेबल नितीन गोवकर, आदित्य म्हार्दोळकर, मनोज पेडणेकर, परेश बुगडे आणि रामा घाडी यांच्या पथकाने सापळा रचून विक्कीला जेरबंद केले.

पणजी पोलिस आणि नवी मुंबईच्या गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई-पणजी पोलिसांच्या पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. विक्की आपल्यासोबत प्राणघातक शस्त्र घेऊन येण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून पाच जिवंत राउंड काडतुसे असलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल, मोबाईल फोन आणि टोयोटा फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात पणजी पोलिसांनी आर्म अॅक्ट 1959च्या कलम 3 आर डब्ल्यू 25 अन्वये गुन्हा क्रमांक 140/2022 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-ED Raid at Sanjay Raut house : रस्त्यावरच ठिय्या मांडणार असल्याचा शिवसैनिकांचा निर्धार

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details