मुंबई - मुंबईत गेल्या वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला असतानाच पुन्हा वाढू लागला आहे. उत्तर मुंबईतील बोरिवली, कांदिवली, मालाड आणि अंधेरी पूर्व-पश्चिममध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण असल्याचे समोर आले आहे. या विभागात पालिकेने कोरोना खबरदारीच्या नियमांच्या कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत बोरिवली, कांदिवली, अंधेरी, मालाडमध्ये सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण - मुंबई कोरोना सक्रिय रुग्ण संख्या
मुंबईत गेल्या वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला असतानाच पुन्हा वाढू लागला आहे. उत्तर मुंबईतील बोरिवली, कांदिवली, मालाड आणि अंधेरी पूर्व-पश्चिममध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण असल्याचे समोर आले आहे. या विभागात पालिकेने कोरोना खबरदारीच्या नियमांच्या कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
या विभागात सर्वाधिक सक्रिय रुग्ण -
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. वर्षभर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान ऑक्टोबर महिन्यात उत्तर मुंबईत कोरोना वाढू लागल्याने पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले. पालिकेने ‘मिशन झिरो’ सुरू करून कोरोना आटोक्यात आणला गेला. मोबाईल व्हॅन, डॉक्टर आपल्या दारी, घरोघरी तपासणी, औषधोपचार, विभागवार कोरोना चाचण्या केल्यामुळे त्यावेळी कोरोना आटोक्यात आला. या मोहिमेमुळे संपूर्ण उत्तर मुंबईतील स्थिती नियंत्रणात होती. मात्र फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा एकदा उत्तर मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिकेसमोर आव्हान वाढू लागले आहे. बोरिवलीत ८१६, अंधेरी पश्चिम ७८३, कांदिवली ७००, मालाड ६८८, अंधेरी पूर्व ६८७ सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. तसेच पूर्व उपगरातील मुलुंडमध्ये ६११, घाटकोपरमध्ये ५७५, भांडूपमध्ये ५७१ इतके सक्रिय रुग्ण आहेत. तर दादर-धारावीत ५३४ आणि ग्रँट रोडमध्ये ५२६ सक्रिय रुग्ण आहेत. पालिकेला या दहा विभागांमध्ये विशेष नजर ठेवाली लागत आहे.
पालिकेकडून विभागवार आढावा -
पालिकेकडून रुग्णवाढ रोखण्यासाठी दैनंदिन कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून २० ते २३ हजारांपर्यंत चाचण्या करण्यात येत आहेत. याशिवाय वरिष्ठ अधिकार्यांकडून प्रत्यक्ष प्रत्येक विभागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. याशिवाय प्रत्येक प्रभागात चाचण्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून कोरोना चाचणी शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. शिवाय घरोघरी तपासणी, औषधोपचार, सर्वेक्षण आणि जनजागृतीवर भर देऊन कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीव पालिकेकडून काम सुरू आहे.
अशी आहे सद्यस्थिती -
विभाग | सक्रिय रुग्ण |
बोरिवली | ८१६ |
अंधेरी पश्चिम | ७८३ |
कांदिवली | ७०० |
मालाड | ६८८ |
अंधेरी पूर्व | ६८७ |