मुंबई : इस्रायलकडून झेब्रा खरेदी करण्याचा पालिकेचा प्रस्ताव फॉरेन ट्रेड्स महासंचालकांनी (डीजीएफटी) ( DGFT ) फेटाळला आहे. त्यामुळे भायखळा प्राणीसंग्रहालय ( Byculla Zoo Authority ) प्राधिकरण ( Junagadh Sakkarbagh Zoo ) आता इतर देशांतील झेब्राच्या शोधात आहे. मात्र, या विलंबामुळे मुंबईकरांना जंगलाच्या राजाच्या स्वागतासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आफ्रिकन हॉर्स सिकनेसला अधिकृत दर्जा नाही : राणीबाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले, भायखळा उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाने जुनागढ सक्करबाग गुजरातमधील प्राणिसंग्रहालय ( Junagadh Sakkarbagh Zoo ) आणि इंदूरमधील कमला नेहरू प्राणिसंग्रहालय येथून पांढरा सिंह घेण्याची योजना आखली होती. त्या बदल्यात राणीच्या बागेकडून झेब्रा देण्यात येणार होता. त्यासाठी गतवर्षी थायलंडस्थित गोट्रेड फार्मिंग कंपनी लिमिटेडला या झेब्राची खरेदी आणि वाहतूक करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. याबाबत प्राणिसंग्रहालयाने केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, प्राणिसंग्रहालयाचा प्रस्ताव केंद्राने नाकारला आहे.
केंद्र सरकारने प्रस्ताव फेटाळला :गुजरात येथील जुनागढ सक्करबाग प्राणीसंग्रहालय आणि इंदूरमधील कमला नेहरू प्राणी संग्रहालय येथून पांढऱ्या सिंहांची जोडी आणली जाणार आहे. त्या बदल्यात या प्राणी संग्रहालयांना इस्रायल येथील रमत गन सफारी पार्कमधून दोन झेब्रा मागवून दिले जाणार होते. त्यासाठी राणीबागेने केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. इस्रायल देशातील झेब्रे "आफ्रिकन हॉर्स सिकनेस" आजारापासून मुक्त नसल्याने तसेच इस्रायलला "आफ्रिकन हॉर्स सिकनेस" अधिकृत दर्जा नसल्याने केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळला आहे.
भारत हा एएचएसमुक्त देश : इस्राईलला ‘आफ्रिकन हॉर्स सिकनेस’चा (एएचएस) अधिकृत दर्जा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ’नुसार आफ्रिकन घोड्यांच्या आजारपणाच्या बाबतीत इस्राईल हा ‘एएचएस’साठी अधिकृत दर्जा नसलेल्या देशांपैकी एक आहे. भारत हा ‘एएचएस’मुक्त देश म्हणून ओळला जातो. झेब्राच्या आयातीला केवळ एएचएसपासून मुक्त देशातून परवानगी दिली जाते.