महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण, जाणून घ्या इतर ठिकाणची परिस्थिती - मुंबईत उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण

राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. मुंबईत उद्दिष्टापेक्षा अधिक 135 टक्के लसीकरण झाले आहे.

By

Published : Mar 4, 2021, 9:07 PM IST

मुंबई -राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. मुंबईत उद्दिष्टापेक्षा अधिक 135 टक्के लसीकरण झाले आहे. तसेच नागपूरात 11 शासकिय केंद्रात तीन दिवसात जवळपास 3 हजार जेष्ठ आणि इतर आजार असणाऱ्याना नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. यासोबत अकोला, ठाणे, कोल्हापूर याठीकाणी देखील लसीकरण होत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा शासकीय केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात वाढता शासकीय यंत्रणेवरील ताण आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी पाहता खासगी रुग्णालयांना लसीकरणाच्या मोहिमेची तयारी झाली आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरणासाठी नावनोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली आहे. शुक्रवारपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच शासकीय रुग्णालयात गर्दी वाढलेली आहे. सामाजिक अंतर ठेवण्यासह अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे. यासाठी खासगी रुग्णालयांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

मुंबई -

मुंबईत काल बुधवारी 27 लसीकरण केंद्रांच्या 138 बूथवर एकूण 13 हजार 800 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा अधिक 135 टक्के लसीकरण झाले आहे. एका दिवसात 18 हजार 566 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 14 हजार 839 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 737 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. काल एकूण 5 हजार 64 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, त्यात 1337 कर्मचाऱ्यांना पहिला तर 3727 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. 2 हजार 483 फ्रंटलाईन वर्कर, 45 ते 59 वर्षांमधील विविध आजार असलेल्या 1078 तर 60 वर्षांवरील 9941 लाभार्थ्यांना लस देण्यात आली देण्यात आली आहे. दरम्यान या लसीकरणाचा 5 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला आहे. कालपर्यंत 2 लाख 30 हजार 46 लाभार्थ्यांना पहिला तर 30 हजार 267 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 2 लाख 60 हजार 313 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

एकूण लसीकरण-

आरोग्य कर्मचारी - 1,38,833

फ्रंटलाईन वर्कर - 1,01,626

45 वर्षावरील आजारी - 1928

60 वर्षावरील - 17,926

एकूण - 2,60,313

अकोला -

जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला एक मार्च पासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 175 जणांनी कोरोनाची लस लावून घेतली होती. दरम्यान, लसीकरणाच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी ऍप वर नोंदणी करूनच लसीकरणासाठी जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहेत.

ठाणे -

लसीकरण कार्यक्रमादरम्यान ठाणे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या विविध लसीकरण केंद्रावरती ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते त्या मानाने त्यांना सोशल डिस्टन्स पाळताना मोठा अडथळा आहे येताना दिसतोय त्यामुळे आता लस घेण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबत मोठा दे धोका निर्माण झालेला आहे.त्यामुळे आता हे लसीकरण केंद्र कोरोनाचे सुपर स्प्रेडर होत आहेत का अशी भीती वक्त केली जात आहे.

कोल्हापूर -

पहिल्या दोन टप्प्यांमध्ये लसीकरणामध्ये अनुत्साह पाहायला मिळाला होता. तिसऱ्या टप्प्यात मात्र पहिल्याच दिवसापासून नागरिक स्वतःहून पुढे येऊन लस घेत आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाकडून सुद्धा लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास शहरासह जिल्ह्यातील 120 सरकारी केंद्रांवर लसीकरण मोहीम पार पडत आहे.

नागपूर -

नागपूरात 11 शासकिय केंद्रात तीन दिवसात जवळपास 3 हजार जेष्ठ आणि इतर आजार असणाऱ्याना नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. पण शासकीय रुग्णालयात गर्दी वाढलेली आहे. सामाजिक अंतर ठेवण्यासह अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे. यासाठी वाढती खाजगी रुग्णालयांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशसने शहरातही शासकीय 11 केंद्र आणि आता खाजगीत 17 केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्याना लसीचे डोसेज सुद्धा देण्यात आले आहे. यासह 40 रुग्णालयाची यादी तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये शासनाच्या आरोग्य विषयक विविध उपचाराची सोया उपलब्ध केली जाणार आहे. त्यानंतर या रुग्णालयात सुद्धा लसीकरणाच्या मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे.

हेही वाचा-अनुराग-तापसी रडारवर; आयकर विभागाकडून २८ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details