मुंबई -गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. राज्यात सोमवारी नव्या 6,270 कोरोना रुग्णांची भर पडली असून 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 13758 जणांना रुग्णालयातून डिस्रार्च देण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थिती 124398 सक्रिय रुग्ण असून 57,33,215 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.89 टक्के एवढा आहे. तर राज्यात आतापर्यंत 1,18,313 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
एकूण रुग्ण संख्या -
मुंबई महानगरपालिका 518, ठाणे 61, ठाणे मनपा 91, नवी मुंबई मनपा 74, कल्याण डोंबवली मनपा 84, उल्हासनगर मनपा 10, भिवंडी मनपा 1, मीरा भाईंदर मनपा 48, पालघर 116, वसई विरार मनपा 74, रायगड 300, पनवेल मनपा 96, (ठाणेमंडळ एकूण 1473), नाशिक 140, नाशिक मनपा 46, मालेगाव मनपा १, अहमदनगर 250, अहमदनगर मनपा 11, धुळे 3, धुळे मनपा 2, जळगाव 27, जळगाव मनपा 5, नंदूरबार 3,(नाशिक मंडळ एकूण 488), पुणे 339, पुणे मनपा 147, पिंपरी चिंचवड मनपा 148, सोलापूर 208, सोलापूर मनपा 6, सातारा 437, (पुणे मंडळ एकूण 1285)कोल्हापूर 666, कोल्हापूर मनपा 256, साांगली 451, साांगली मिरज कुपवाड मनपा 72, सिंधुदुर्ग 474, राधानगरी 446, (कोल्हापूर मंडळ एकूण 2362) औरंगाबाद 89, औरंगाबाद मनपा 31, जालना 35, हिंगोली 13, परभणी 2, परभणी मनपा 1, (औरंगाबाद मंडळ एकूण 171), लातूर 10, लातूर मनपा 4, उस्मानाबाद 98, बीड 130, नांदेड 20, नांदेड मनपा 11,(लातूर मंडळ एकूण 273), अकोला 6, अकोला मनपा 6, अमरावती 48, अमरावती मनपा 6, यवतमाळ 19, बुलडाणा 29, वाशिम 30, (अकोला मंडळ एकूण 144)नागपूर 11, नागपूर मनपा 26, वर्धा 2, भांडारा 5, गोंदिया 2, चंद्रपूर 9, चंद्रपूर मनपा 6, गडचिरोली 13, (नागपूर एकूण 74)