महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Update - राज्यात 2 हजार 486 नवे रुग्ण, 44 रुग्णांचा मृत्यू - सातारा बातमी

राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारांदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज शनिवारी 9 ऑक्टोबरला 2 हजार 486 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 44 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 2 हजार 446 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

v
संपादित छायाचित्र

By

Published : Oct 9, 2021, 8:51 PM IST

मुंबई- राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारांदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज शनिवारी 9 ऑक्टोबरला 2 हजार 486 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 44 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 2 हजार 446 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

33 हजार 6 सक्रिय रुग्ण

आज राज्यात 2 हजार 486 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 75 हजार 578 वर पोहोचला आहे. तर आज 44 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 514 वर पोहोचला आहे. आज 2 हजार 446 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 99 हजार 464 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 57 हजार 326 नमुन्यांपैकी 65 लाख 75 हजार 578 नमुने म्हणजेच 10.95 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 41 हजार 499 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 33 हजार 6 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 75, 20 सप्टेंबरला 2 हजार 583, 22 सप्टेंबरला 3 हजार 608, 27 सप्टेंबरला 2 हजार 432, 29 सप्टेंबरला 3 हजार 187, 30 सप्टेंबरला 3 हजार 63, 1 ऑक्टोबरला 3 हजार 105, 2 ऑक्टोबरला 2 हजार 696, 3 ऑक्टोबरला 2 हजार 692, 4 ऑक्टोबरला 2 हजार 26, 5 ऑक्टोबरला 2 हजार 401, 6 ऑक्टोबरला 2 हजार 876, 7 ऑक्टोबरला 2 हजार 681, 8 ऑक्टोबरला 2 हजार 620, 9 ऑक्टोबरला 2 हजार 486 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 1 ऑक्टोबरला 50, 2 ऑक्टोबरला 49, 3 ऑक्टोबरला 41, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 7 ऑक्टोबरला 49, 8 ऑक्टोबरला 59, 8 ऑक्टोबरला 44 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई महापालिका - 510

अहमदनगर - 340

पुणे - 264

पुणे पालिका - 135

पिंपरी चिंचवड पालिका - 111

सोलापूर- 162

सातारा - 102

हेही वाचा -ड्रग्ज क्रुझ प्रकरण : एनसीबीने 11 जणांना पकडून तिघांना सोडले; समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड्स चेक व्हावेत; नवाब मलिकांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details