मुंबई- राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज रविवारी (दि. 10 ऑक्टोबर) 2 हजार 294 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 29 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 1 हजार 823 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.
33 हजार 449 सक्रिय रुग्ण
आज राज्यात 2 हजार 294 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 77 हजार 872 वर पोहोचला आहे. तर आज 28 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 542 वर पोहोचला आहे. आज 1 हजार 823 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 1 हजार 287 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 1 लाख 98 हजार 173 नमुन्यांपैकी 65 लाख 77 हजार 872 नमुने म्हणजेच 10.93 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 41 हजार 892 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 33 हजार 449 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.