महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाच्या नव्या 2267 रुग्णांची नोंद, 52 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते मात्र ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Sep 19, 2020, 5:06 AM IST

मुंबई- शहर परिसरात शुक्रवारी कोरोनाच्या 2267 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 80 हजारावर गेला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 52 मृतांपैकी 37 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 39 पुरुष तर 13 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 80 हजार 542 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 372 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 925 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 37 हजार 664 वर गेला आहे. सध्या मुंबईत 34 हजार 136 सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा -राज्यात दिवसभरात २१ हजार ६५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४०५ मृत्यू

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 56 दिवस तर सरासरी दर 1.25 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 585 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 665 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 9 लाख 77 हजार 722 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

असे वाढले रुग्ण

दिनांक रुग्णसंख्या
2 सप्टेंबर 1622
3 सप्टेंबर 1526
4 सप्टेंबर 1929
5 सप्टेंबर 1735
6 सप्टेंबर 1910
7 सप्टेंबर 1788
8 सप्टेंबर 1346
9 सप्टेंबर 2227
10 सप्टेंबर 2371
11 सप्टेंबर 2172
12 सप्टेंबर 2321
13 सप्टेंबर 2085
14 सप्टेंबर 2256
15 सप्टेंबर 1585
16 सप्टेंबर 2352
17 सप्टेंबर 2389
18 सप्टेंबर 2267

ABOUT THE AUTHOR

...view details