महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाच्या नव्या 2352 रुग्णांची नोंद, 50 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना स्थिती

मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Sep 17, 2020, 12:19 AM IST

मुंबई- शहर परिसरात आज (बुधवारी) कोरोनाचे 2,352 नवे रुग्ण आढळून आले असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 31 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 13 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 75 हजार 886 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 277 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1500 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 35 हजार 566 वर गेला आहे. सध्या मुंबईत 31 हजार 678 सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा -राज्यात कोरोनाचा उद्रेक, आज २३ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 55 दिवस तर सरासरी दर 1.28 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 601 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 8 हजार 992 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 9 लाख 50 हजार 112 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

असे वाढले रुग्ण

दिनांक रुग्णसंख्या
2 सप्टेंबरला 1622
3 सप्टेंबरला 1526
4 सप्टेंबरला 1929
5 सप्टेंबरला 1735
6 सप्टेंबरला 1910
7 सप्टेंबरला 1788
8 सप्टेंबरला 1346
9 सप्टेंबरला 2227
10 सप्टेंबर 2371
11 सप्टेंबर 2172
12 सप्टेंबर 2321
13 सप्टेंबर 2085
14 सप्टेंबर 2256
15 सप्टेंबर 1585
16 सप्टेंबर 2352

ABOUT THE AUTHOR

...view details