महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत गुरूवारी 31 हजार 377 लाभार्थ्यांचे लसीकरण - मुंबई कोरोना बातम्या

लसीकरणर मोहिमेदरम्यान आज गुरूवारी 31 हजार 377 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 28 लाख 17 हजार 425 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

more than thirty thousand people vaccinated in mumbai on Thursday
मुंबईत गुरूवारी 31 हजार 377 लाभार्थ्यांचे लसीकरण

By

Published : May 14, 2021, 1:30 AM IST

मुंबई -मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आज गुरूवारी 31 हजार 377 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 28 लाख 17 हजार 425 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. दरम्यान, लस घेण्यासाठी नागरिकांनी कोविन अ‌ॅपवर नोंद केल्यानंतर मोबाईलवर संदेश आला, तरच लसीकरणाला यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लसीकरणाची आकडेवारी -

मुंबईत आज 31 हजार 377 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 16 हजार 792 लाभार्थ्यांना पहिला तर 14 हजार 585 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 28 लाख 17 हजार 425 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 21 लाख 10 हजार 220 लाभार्थ्यांना पहिला, तर 7 लाख 7 हजार 205 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 98 हजार 628 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 55 हजार 699 फ्रंटलाईन वर्कर, 11 लाख 25 हजार 740 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 9 लाख 91 हजार 788 तर 18 ते 44 वर्षामधील 45 हजार 570 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण मोहीम -

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. तसेच 1 मेपासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे.

एकूण लसीकरण - 28,17,425

  • आरोग्य कर्मचारी - 2,98,628
  • फ्रंटलाईन वर्कर - 3,55,699
  • जेष्ठ नागरिक - 11,25,740
  • 45 ते 59 वय - 9,91,788
  • 18 तर 44 वय - 45,570

हेही वाचा - सलग दुसऱ्या वर्षी अक्षयतृतीयेला 'लॉकडाऊन'; सराफ व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे होणार नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details