महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 4, 2021, 10:03 PM IST

ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : शनिवारी राज्यात 782 नवे कोरोना रुग्ण; तर 770 रुग्णांना डिस्चार्ज

गेल्या काही दिवसांत मुंबईत रोज 1 हजाराच्या दरम्यान कोरोना रुग्ण (Corona Update) आढळून येत होते. मात्र, काही दिवसांपासून यात घट झाली आहे. शनिवारी राज्यात 782 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona Update in maharashtra
Corona Update in maharashtra

मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसांत 1 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज शनिवारी 784 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 770 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

राज्यात 7,129 सक्रिय रुग्ण -

आज राज्यात 782 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 38 हजार 071 वर पोहचला आहे. तर आज 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 149 वर पोहचला आहे. आज 770 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 86 हजार 105 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 59 लाख 63 हजार 184 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी
10.06 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 79 हजार 460 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 7 हजार 129 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई महापालिका - 213
  • ठाणे पालिका - 28
  • नवी मुंबई पालिका - 29
  • कल्याण डोबिवली पालिका - 16
  • वसई विरार पालिका - 21
  • पनवेल पालिका - 17
  • नाशिक - 29
  • नाशिक पालिका - 15
  • अहमदनगर - 68
  • पुणे - 63
  • पुणे पालिका - 89
  • पिंपरी चिंचवड पालिका - 31

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 11 नोव्हेंबरला 997, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766, 25 नोव्हेंबरला 848, 26 नोव्हेंबरला 852, 28 नोव्हेंबरला 832, 29 नोव्हेंबरला 536, 30 नोव्हेंबरला 678, 1 डिसेंबरला 767, 2 डिसेंबरला 796, 3 डिसेंबरला 664, 4 डिसेंबरला 782, असे सर्वात कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा -Omicron In Maharashtra: ओमायक्रॉनचा महाराष्ट्रात शिरकाव! डोंबिवलीत सापडला पहिला रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details