मुंबई -मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६, ११ जूनला १७४५ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात किंचित वाढ होऊन १८०३ रुग्णांची नोंद झाली. गेले काही दिवस शून्य तर कधी एका मृत्यूची नोंद होत होती. आज त्यात वाढ होऊन २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १० हजार ८८९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
१८०३ नवे रुग्ण -मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासांत १५ हजार ९२२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १८०३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ९६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ८० हजार ७४७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ५० हजार २८५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १० हजार ८८९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५१३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१३३ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १८०३ रुग्णांपैकी १६९२ म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ८६७ बेड्स असून त्यापैकी ४२५ बेडवर रुग्ण आहेत.