मुंबई- राज्यात बुधवारी कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात १०५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद एकाच दिवसात झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८९७ झाली आहे.तसेचआतापर्यंत ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ०३ हजार ९७६ नमुन्यांपैकी ५६ हजार ९४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८२ हजार ७०१ लोक गृह विलगीकरणात असून ३७ हजार ७६१ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात १०५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८९७ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये ३२, ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९, नवी मुंबईमध्ये ७, रायगडमध्ये ७, अकोल्यात ६, औरंगाबादमध्ये ४, नाशिक ३, सोलापुरात ३, सातारा २, अहमदनगर १, नागपूर १, नंदुरबार १, पनवेल १ तर वसई-विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. याशिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.
आज(बुधवारी) नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २१ एप्रिल ते २४ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६६ मृत्यूंपैकी मुंबईचे २१, ठाण्याचे १५, जळगावचे १०, नवी मुंबईचे ७, रायगडचे ७, अकोल्याचे २, साताऱ्याचे २, अहमदनगरचा १, नंदुरबारचा १ मृत्यू आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७२ पुरुष तर ३३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५० रुग्ण आहेत तर ४५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या १०५ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये (६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
*मुंबई महानगरपालिका:* बाधीत रुग्ण- (३४,०१८), बरे झालेले रुग्ण- (८४०८), मृत्यू- (१०९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४,५०७)
*ठाणे:* बाधीत रुग्ण- (७७८१), बरे झालेले रुग्ण- (२२२४), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४०८)
*पालघर:* बाधीत रुग्ण- (७७१), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८१)
*रायगड:* बाधीत रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (४८८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८२)
*नाशिक:* बाधीत रुग्ण- (१०१२), बरे झालेले रुग्ण- (७५०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१०)
*अहमदनगर:* बाधीत रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४)
*धुळे:* बाधीत रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)
*जळगाव:* बाधीत रुग्ण- (५०५), बरे झालेले रुग्ण- (२१८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३६)
*नंदूरबार:* बाधीत रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)
*पुणे:* बाधीत रुग्ण- (६६१४), बरे झालेले रुग्ण- (३०८६), मृत्यू- (२९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२३७)
*सोलापूर:* बाधीत रुग्ण- (६७९), बरे झालेले रुग्ण- (२८७), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४०)
*सातारा:* बाधीत रुग्ण- (३९५), बरे झालेले रुग्ण- (१२८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६०)
*कोल्हापूर:* बाधीत रुग्ण- (३४६), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२७)
*सांगली:* बाधीत रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)
*सिंधुदुर्ग:* बाधीत रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
*रत्नागिरी:* बाधीत रुग्ण- (१९२), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८)
*औरंगाबाद:* बाधीत रुग्ण- (१३३५), बरे झालेले रुग्ण- (७९३), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८५)
*जालना:* बाधीत रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (२३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६)
*हिंगोली:* बाधीत रुग्ण- (१३३), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)
*परभणी:* बाधीत रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
*लातूर:* बाधीत रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
*उस्मानाबाद:* बाधीत रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)
*बीड:* बाधीत रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)
*नांदेड:* बाधीत रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
*अकोला:* बाधीत रुग्ण- (४८७), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६३)
*अमरावती:* बाधीत रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०)
*यवतमाळ:* बाधीत रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
*बुलढाणा:* बाधीत रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२)
*वाशिम:* बाधीत रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)
*नागपूर:* बाधीत रुग्ण- (४८४), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४१)
*वर्धा:* बाधीत रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)
*भंडारा:* बाधीत रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)
*गोंदिया:* बाधीत रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)
*चंद्रपूर:* बाधीत रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)
*गडचिरोली:* बाधीत रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
*इतर राज्ये:* बाधीत रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)
*एकूण: बाधीत रुग्ण-(५६,९९८), बरे झालेले रुग्ण- (१७,९१८), मृत्यू- (१८९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण-(३७,१२५)*
(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील ११९ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यांमध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड -१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.५ दिवस होता तो आज १४.७ दिवस झाला आहे. देशाच्या एकूण प्रयोगशाळा तपासणीच्या (३२,४२,१६०) सुमारे १२.४ टक्के तपासणी महाराष्ट्रात झाली असून दर दहा लाख लोकसंख्येमागे राज्यात ३१४२ जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. हे प्रमाण देशपातळीवर २३६३ एवढे आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.५ टक्के एवढे आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २६८४ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार ११९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६८.०६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.