मुंबई- राज्यात आज ९,१६४ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५,९७,२५५ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ४,९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४५,५६० रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
राज्यात आज ४,९०७ नवीन रुग्णांचे निदान, १२५ रुग्णांचा मृत्यू
राज्याकील कोरोना बाधित रुग्ण बर होण्याची टक्केवारू दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात एकूण ९ हजार १६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नवीन बाधित रुग्णांचा आकडा हा आजच्या कोरोनामुक्त रुग्णांच्या निम्मा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६,००,३२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,३१,८३३ (१८.०४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४१,११८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,५५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज (बुधवारी) एकूण ८८,०७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कधी किती रुग्ण आढळून आले -
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची तर २६ ऑक्टोबरला ३६४५ सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. ७ नोव्हेंबरला ३,९५९ त्यानंतर आज ३,७९१ इतके कमी रुग्ण आढळून आले आहेत.