मुंबई- मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तीन दिवस तीन हजारावर, त्यानंतर सलग तीन दिवस पाच हजारावर तर दोन दिवस 6 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्या घटली होती. आज पुन्हा त्यात वाढ झाली आहे. आज 5394 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
51 हजार 411 सक्रिय रुग्ण -
मुंबईत आज 5394 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 14 हजार 714 वर पोहचला आहे. आज 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 686 वर पोहचला आहे. 3130 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 50 हजार 660 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 51 हजार 411 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 49 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 72 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 616 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 40 लाख 83 हजार 173 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -