मुंबई- मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तीन दिवस सर्वाधिक तीन हजारावर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी वर्षभरातील सर्वाधिक 5 हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. आज मुंबईत 5513 रुग्णांची नोंद झाली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
सर्वाधिक रुग्णांची नोंद -
मुंबईत 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504 रुग्ण आढळून आले होते. आज त्यात वाढ होऊन 5513 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 85 हजार 628 वर पोहचला आहे. आज 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 629 वर पोहचला आहे. 1658 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 35 हजार 261 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 37 हजार 804 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 68 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 43 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 497 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 38 लाख 88 हजार 873 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -