मुंबई- मुंबईत कोरोनाच्या ( Mumbai Corona Update ) तीन लाटा आल्या असून ओमायक्रॉन या व्हेरियंटचे ( Omicron Variant ) रुग्ण आढळून आले आहेत. विषाणूचा हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरही जे नागरिक मास्क घालत नाहीत, अशा नागरिकांकवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर ( Train Passengers ) पालिका ( BMC ), क्लिनअप मार्शल ( Cleanup Marshal ) तसेच पोलिसांकडून ( Police ) कारवाई करण्यात येत आहे. गेल्या ६८६ दिवसात तब्बल ४५ लाख ७ हजार ३७२ विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ८९ कोटी ६३ लाख ८ हजार ४७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
४५ लाख नागरिकांवर कारवाई -मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्याने एप्रिल महिन्यापासून नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली. १७ एप्रिल, २०२० ते १५ फेब्रुवारी, २०२२ या ६८६ दिवसांत ४५ लाख ७ हजार ३७२ विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ८९ कोटी ६३ लाख ८ हजार ४७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने ३५ लाख ८२ हजार ४८२ नागरिकांवर कारवाई करत ७१ कोटी १३ लाख ३० हजार ४७५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी ९ लाख ९९९ नागरिकांवर कारवाई करत १८ कोटी १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रेल्वेमध्ये २३ हजार ८९१ नागरिकांवर कारवाई करून ४७ लाख ७८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.