मुंबई: मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका ड्रग्ज उत्पादन युनिटवर छापा टाकून 1,400 कोटी रुपयांचे 700 किलो पेक्षा ( 700 KG OF MEPHEDRONE ) जास्त 'मेफेड्रोन' जप्त केले असून या संदर्भात पाच जणांना अटक केली ( MD Drug Seized In Palghar ) आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) युनिटवर ( Mumbai ANC unit ) छापा टाकला.
चार जणांना अटक - विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एएनसीच्या पथकाने या परिसरावर छापा टाकला आणि त्यादरम्यान तेथे प्रतिबंधित औषध मेफेड्रोन तयार केल्याचे समोर आले. चार आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे, तर नालासोपारा येथे एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. शहर पोलिसांनी अलीकडच्या काळात पकडलेली ही सर्वात मोठी अंमली पदार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. मेफेड्रोनला 'म्याव म्याऊ' किंवा एमडी असेही म्हणतात. नॅशनल नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यानुसार त्यावर बंदी आहे.