मुंबई -मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट (The third wave of corona virus) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट (Decrease in patients) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होऊन १३ एप्रिलला ७३, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज शुक्रवारी त्यात किंचित घट होऊन ६८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद ( Corona Deaths ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ४७४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.
आज ६८ नवे रुग्ण -मुंबईत आज शुक्रवारी ६८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५९ हजार १४१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३९ हजार १०५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४७४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ११,३४३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००६ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ६८ रुग्णांपैकी ६५ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार ०४४ बेड्स असून त्यापैकी १२ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहून अधिक बेड रिक्त आहेत.