मुंबई- मार्च, 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज (दि. 31 मार्च) मुंबईत 28 हजार 421 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 11 लाख 52 हजार 974 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत आज (दि. 31 मार्च) 28 हजार 421 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 25 हजार 215 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 206 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 11 लाख 52 हजार 974 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 10 लाख 2 हजार 5 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 50 हजार 969 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 45 हजार 794 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 50 हजार 793 फ्रंटलाईन वर्कर, 5 लाख 53 हजार 520 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या 1 लाख 2 हजार 868 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.