महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'प्रकल्प मैत्री'अंतर्गत गृह विलगीकरणातील १४ हजार ८०० रुग्‍णांवरील उपचार पूर्ण - प्रकल्प मैत्रीत विलगीकरणातील रुग्णांवर उपचार

'प्रकल्‍प मैत्री' प्रकल्‍पाबाबत बोलताना महापालिका आयुक्‍त इकबालसिंह चहल यांनी सांगितले की, वैद्यकीय उपचार केंद्रात असणाऱ्यांसह गृहविलगीकरणात असलेल्‍या प्रत्‍येक रुग्‍णांपर्यंत कोव्हिड उपचार पोहोचावेत, यासाठी महापालिका सातत्‍याने व अथकपणे प्रयत्‍नरत आहे. या अनुषंगाने ‘प्रकल्‍प मुंबई’ या स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या सहकार्याने आणि पोर्टीया हेल्‍थ केअर या अंमलबजावणी भागीदारांच्‍या सहभागासह ‘मुंबई मैत्री’ हा प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे.

maitri project mumbai
'प्रकल्प मैत्री'

By

Published : Aug 29, 2020, 7:54 AM IST

मुंबई- राजधानी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यास रुग्णाला अलगीकरणात किंवा विलगीकरणात तसेच गृह विलगीकरणात ठेवले जाते. गृह विलगीकरणातील म्हणजेच होम क्वारंटाईन असलेल्या कोरोना रुग्‍णांच्‍या उपचाराचा नियमित पाठपुरावा पालिकेकडून केला जात आहे. जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाला पालिकेने 'प्रकल्‍प मैत्री' असे नाव दिले आहे. त्याअंतर्गत २१,२५० रुग्‍णांशी नियमित संपर्क साधला जात होता. ज्‍यापैकी १४ हजार ८०० रुग्‍णांवरील उपचार पूर्ण झाले असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

'प्रकल्‍प मैत्री' प्रकल्‍पाबाबत बोलताना महापालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, वैद्यकीय उपचार केंद्रात असणाऱ्यांसह गृहविलगीकरणात असलेल्‍या प्रत्‍येक रुग्‍णांपर्यंत कोव्हिड उपचार पोहोचावेत, यासाठी महापालिका सातत्‍याने व अथकपणे प्रयत्‍नरत आहे. या अनुषंगाने ‘प्रकल्‍प मुंबई’ या स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या सहकार्याने आणि पोर्टीया हेल्‍थ केअर या अंमलबजावणी भागीदारांच्‍या सहभागासह ‘मुंबई मैत्री’ हा प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. या प्रकल्‍पातून प्राप्‍त झालेली शिकवण आणि अनुभव यांची पुढील तीन महिन्‍यांतील माहिती ही इतर शहरांना आणि जिल्‍हा प्रशासनांना कळविण्‍यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नियंत्रण कक्षावरील कामाचा ताण कमी होण्‍यास मदत झाली आहे.

काय आहे प्रकल्‍प ‘मुंबई मैत्री’ -
गृहविलगीकरणात असलेल्‍या कोव्हिड रुग्‍णांशी प्रशिक्षित आरोग्‍य कर्मचाऱ्यांद्वारे नियमितपणे दूरध्‍वनी संवाद साधला जातो. या अंतर्गत प्रामुख्‍याने उपचार विषयक पाठपुरावा केला जातो. रुग्‍ण व त्‍याच्‍या कुटुंबीयांची आरोग्‍य परिस्थिती जाणून घेतल्‍या जातात. रुग्‍ण व त्‍याच्‍या कुटुंबीय मानसिक तणावात असल्‍याचे जाणवल्‍यास त्‍यांना मानसिक आरोग्‍य विषयक समुपपदेशकांशी व भावना विषयक तज्‍ज्ञांशी संवाद साधण्‍याची सुविधा १८००-१०२-४०४० या क्रमांकावर उपलब्‍ध करुन देण्‍यात येते. रुग्‍णालयातून सुट्टी देण्‍यात आलेल्‍या, परंतु ७ दिवसांसाठी गृहविलगीकरणाची शिफारस करण्‍यात आलेल्‍या रुग्‍णांच्‍या स्‍तरावर देखील या प्रकल्‍पांतर्गत नियमित पाठपुरावा करण्‍यात येत आहे.

कसे केले जाते काम -
या प्रकल्‍पांतर्गत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या विभागस्‍तरीय नियंत्रण कक्षाशी नियमितपणे समन्‍वय साधला जातो. तसेच दूरध्‍वनी पाठपुरावा दरम्‍यान एखादया रुग्‍णामध्‍ये कोविड लक्षणे असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास त्‍याबाबत नियंत्रण कक्षाला कळविले जाते. जेणेकरुन आवश्‍यकतेनुसार रुग्‍णवाहिकेची रुग्‍णशैय्येची व्‍यवस्‍था करता येते. ज्‍या रुग्‍णांचे वय ५५ वर्षांपेक्षा अधिक आहे किंवा ज्‍यांना इतर काही आजार आहेत त्‍यांच्‍याबाबत विशेष लक्ष देऊन पाठपुरावा केला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details