महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी ११००हून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण

मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली.

Mumbai corona update
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Mar 5, 2021, 8:06 PM IST

मुंबई -गेल्या आठवड्यात चार ते पाच दिवस मुंबईत एक हजारहून रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दोन दिवस साडेआठशे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर सलग तीन दिवस अकराशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. आज 1173 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली.


कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत आज 1,173 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 31 हजार 16 वर पोहचला आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 490 वर पोहचला आहे. 1151 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 8 हजार 178 वर पोहोचली आहे.

मुंबईत सध्या 10 हजार 469 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी 241 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 15 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 188 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 33 लाख 72 हजार 926 चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा-प्राप्तिकर विभागाची सलग तिसर्‍या दिवशी छापेमारी सुरू

हे विभाग आहेत हॉटस्पॉट -
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-मानसुख हिरेन बेपत्ता झाल्यानंतर त्यांनी मित्रांना केला होता संपर्क?

रुग्णसंख्या वाढली -
मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897, 21 फेब्रुवारीला 921, 22 फेब्रुवारीला 760, 23 फेब्रुवारीला 643, 24 फेब्रुवारीला 1167, 25 फेब्रुवारीला 1145, 26 फेब्रुवारीला 1034, 27 फेब्रुवारीला 987, 28 फेब्रुवारीला 1051, 1 मार्चला 855, 2 मार्चला 849, 3 मार्चला 1121, 4 मार्चला 1103, 5 मार्चला 1173 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details