मुंबईमुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. अडीच वर्षात ११ लाख ३३ हजार १७२ मुंबईकरांना कोरोनाची बाधा झाली. तर १९ हजार ६६४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. गरिबांना अन्न वाटप, कंटेनमनेंट झोनची अंमलबजावणी, रुग्णांवर उपचार, रुग्णांना रुग्णालयात ने आन करणे, मुंबईची स्वच्छता राखणे, मुंबईकरांना पाणीपुरवठा करणे, नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा देणे आदी कामे महापालिका कर्मचाऱ्यांकडून केली गेली. ही कामे करताना मुंबई महापालिकेच्या २७० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. Death of 270 employees of Mumbai Municipal Corporation यामध्ये सर्वाधिक मृत्यू घनकचरा, आरोग्य विभागातील कर्मचार्यांचा होता.
१७७ जणांना आर्थिक मदत, १६० वारसांना नोकरीकोरोना दरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करु असे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी जाहिर केले होते. यामुळे पालिकेने आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ५० लाखांची आर्थिक मदत आणि एका वारसाला नोकरी देण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र केंद्र सरकारने कोरोना योद्धा म्हणून पालिकेने पाठवलेले बहुतेक दावे फेटाळून लावले आहेत. २७० पैकी २३ जणांना केंद्र सरकारच्या माध्यमातून ५० लाखांची मदत करण्यात आली. मुंबई महापालिकेने १७७ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत दिली आहे. तसेच शहीद झालेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या १६० वारसांना पालिकेच्या नोकरीत समावून घेतले आहे.