मुंबई -ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे. मात्र, पावसाळा काही थांबायचे नाव घेत नाही. महाराष्ट्रात आजही काही जिल्ह्यांची मुसळधार पाऊस कोसळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. दरम्यान, आजही मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यातून मोसमी वारे परतले असले तरी आंध्रप्रदेश या किनारपट्टीच्या भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राज्यांवर याचा परिणाम जाणवू लागला आहे. केरळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडय़ातील परभणी आणि विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. आज विदर्भात चंद्रपूर, अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
ऑक्टोबर हीट चा परिणाम