मुंबई -राज्यात विशेष अधिवेशन3 आणि 4 जुलैला पार पडले आहे. यावेळी राज्याचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon Session ) 18 जुलैला होईल, अशी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता विधिमंडळ ( Legislature ) सचिवालया कडून पत्र काढत 18 जुलैला होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलल्या बाबतची माहिती विधिमंडळ सचिवालय कडून पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. राज्यात एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांचे सरकार आले असले, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अधिवेशन पुढे ढकले गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू आहे.
तसेच विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनीही पावसाळी अधिवेशन पुढे न करण्याचे संकेत दिले होते. 18 जुलैला राष्ट्रपती ( President ) निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन घेता येणे शक्य नसल्याने अधिवेशन पुढे करण्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच राष्ट्रपती निवडणूक झाल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यायाबाबत देखील चर्चा सुरू आहेत. 19 जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असल्याने त्यानंतरच पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे.
असंसदीय घोषित शब्द :संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या ( lok sabha secretariat monsoon session ) अगदी आधी सदस्यांच्या वापरासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संकलनामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानमंडळांमध्ये 2021 मध्ये असंसदीय घोषित करण्यात आलेल्या शब्दांचा किंवा वाक्यांचा समावेश आहे. या संकलनानुसार असंसदीय शब्द, वाक्ये किंवा अशोभनीय अभिव्यक्ती या वर्गवारीत येणारे शब्द म्हणजे हरामी, काळे सत्र, दलाल, रक्त शेती, चिलम घेणे, छोकारा, कोळसा चोर, गोरू चोर, चरस पिणे, बैल असे शब्द आहेत.