मुंबई- विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवरपासून सुरू झाले आहे. यासाठी राज्यातील विधानसभेचे सदस्य सभागृहात दाखल झाले आहे. सत्ताधारी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी चांगलीच तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. तर, नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात दाखल होताच 'आयाराम गयाराम, जय श्री राम' अशा घोषणा विरोधकांनी विखेंना उद्देशून दिल्या.
आयाराम गयाराम, जय श्री राम' विरोधकांच्या विखेंना उद्देशून घोषणा विधीमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी भाजपचे अखेरचे अधिवेशन आहे. त्यामुळे अनेक विधेयक मंजूर करून घेण्यावर त्यांचा भर असणार आहे. तर, मराठा आरक्षण, दुष्काळासह अन्य प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी केली आहे.
Live :
- विधीमंडळाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण चालू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची अध्यक्षांची मागणी
- विरोधी पक्षनेता योग्यवेळी निवडणार - विधानसभा अध्यक्ष
- आमदार विजय वेडट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याची मागणी
- विधीमंडळाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सकाळपासून बंद, असल्याचे आमदार अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस आणि रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांना सभागृहात आदरांजली.
- आमदारांनी दिलेले राजीनामे अध्यक्षांनी स्वीकारले
- आमदार छगन भुजबळ यांचा नवनिर्वाचीत मंत्र्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव अध्यक्षांनी भेटाळला
- विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचीत मंत्र्यांची ओळख आणि त्यांना दिलेल्या खाते वाटपाची माहिती दिली.
- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री-विरोधक आमने-सामने
- "आले रे आले, चोरटे आले", मुख्यमंत्री विधानसभेत दाखल होताच विरोधकांची घोषणाबाजी
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुख्यमंत्री विधानभवनात दाखल
या अधिवेशनात 13 नवीन विधेयक आणि विधान सभेतील प्रलंबित 12, विधान परिषदेतील प्रलंबित 3 अशी एकूण 28 विधेयक चर्चेला येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. गेली 5 वर्ष सर्व समाजाला समोर ठेवून निर्णय घेतले. आव्हानांना सकारात्मकतेने पुढे गेल्यामुळे जनतेने विश्वास दाखविला. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पाऊले उचलल्याने वैद्यकिय प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात यश आले आहे. धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे प्रतिबिंब येत्या अर्थसंकल्पात दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.