महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sunil Prabhu शिवसेना विधिमंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार थकले नाही सुनिल प्रभूंचे स्पष्टीकरण - शिवसेना विधिमंडळ कर्मचारी पगार सुनील प्रभू

शिवसेना पक्षाचे विधिमंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या सहा महिन्यापासून झालेले नाहीत अशी चर्चा सुरु होती त्यावर आता शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे कर्मचाऱ्यांचा कोणताही पगार थकलेला नाही असे प्रभूंनी सांगितलं sunil prabhu on shivsena legislative office worker salary आहे

Sunil Prabhu
Sunil Prabhu

By

Published : Aug 17, 2022, 5:13 PM IST

मुंबई - गेल्या दोन महिन्यापासून शिवसेना पक्षात असलेला वाद हा सर्वश्रुत आहे. मात्र, या वादामुळे शिवसेना पक्षाचे विधिमंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या सहा महिन्यापासून झालेले नाहीत, अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्याचे काम शिवसेना प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे. शिवसेना विधिमंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा कोणताही पगार थकलेला नाही. शिवसेना पक्षाचा जो काही वाद आहे, तो गेल्या दोन महिन्यापासून आहे. पण, या गेल्या दोन महिन्याचा ही पगार सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण सुनील प्रभूंनी दिले sunil prabhu on shivsena legislative office worker salary आहेत.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'हे व्यवहार जरी थांबवण्यात आले असले...' -विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनिल प्रभू म्हणाले की, पक्षांमध्ये वाद होण्याआधी पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि प्रतोद सुनील प्रभू यांच्या नावे असलेल्या बँक खात्यामधून त्या कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात होते. पण, पक्षामध्ये झालेल्या वादानंतर बँक खात्याचे व्यवहार थांबविण्यात आले आहेत. मात्र, हे व्यवहार जरी थांबवण्यात आले असले तरी, कर्मचाऱ्यांचा कोणताही पगार थकलेला नाही. आतापर्यंत कर्मचाऱ्यांचे सर्व महिन्याचे पगार झाले असल्याचं सुनील प्रभू यांनी स्पष्ट केला आहे.

'लोक अफवा पसरवत आहेत' - पावसाळी अधिवेशनाचा हा पहिलाच दिवस असल्याने शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयात कर्मचाऱ्यांना पगार दिला गेला नाही. याबाबत काही लोक अफवा पसरत असल्याचा आरोप सुनील प्रभू यांनी केला. यामध्ये तथ्य नसून, कर्मचाऱ्यांना आतापर्यंतचा त्यांचा पगार देण्यात आला आहे, असेही सुनील प्रभूंनी सांगितलं आहे.

हेही वाचा -Fadnavis In BJP Central Committee नितीन गडकरींचा पत्ता कट, भाजपच्या केंद्रीय समितीत देवेंद्र फडणवीस यांचा समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details