महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 21, 2022, 6:23 PM IST

ETV Bharat / city

Monsoon Session In Maharashtra : पावसाळी अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता

राज्यातील पावसाळी अधिवेशन ( Monsoon Session In Maharashtra ) ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 18 जुलैला होणारे पावसाळी अधिवेशन ( Monsoon Session In Maharashtra ) पुढे ढकलण्यात आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची माहिती मिळत आहे.

Monsoon Session In Maharashtra
पावसाळी अधिवेशन

मुंबई -18 जुलैला होणारे पावसाळी अधिवेशन ( Monsoon Session In Maharashtra ) पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, अद्याप अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची माहिती मिळत आहे. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर 18 जुलैला होणार अधिवेशन पुढे ढकलल्या बाबत विधिमंडळ सचिवालयात पत्रक आले होते. त्यानंतर हे अधिवेशन जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होईल अशा प्रकारचा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता हेच अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा -Ambadas Danve : 'मला शिंदे गटाकडून ऑपर, मात्र मी...'; अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट

25 जुलैला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता -सरकार स्थापन होऊन वीस दिवस उलटले असले तरी अद्यापही मंत्रिमंडळ ( Cabinet expansion of Shinde government ) विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार झालाच नसल्याने पावसाळी अधिवेशन घेणेबाबत अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्रा चा राज्यातल्या मंत्रिमंडळ ( Cabinet expansion In Maharashtra ) विस्तार 25 जुलैला होणार असल्याची माहिती मिळत आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन घेण्याची शक्यता आहे.


दरम्यान, राज्यात विशेष अधिवेशन 3, 4 जुलैला पार पडले आहे. यावेळी राज्याचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon Session ) 18 जुलैला होईल, अशी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, विधिमंडळ ( Legislature ) सचिवालया कडून पत्र काढत 18 जुलैला होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलल्या बाबतची माहिती विधिमंडळ सचिवालय कडून पत्रकाद्वारे देण्यात आली होती. राज्यात एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांचे सरकार आले असले, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अधिवेशन पुढे ढकले गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू आहे.

तसेच विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनीही पावसाळी अधिवेशन पुढे न करण्याचे संकेत दिले होते. 18 जुलैला राष्ट्रपती ( President ) निवडणूक होती. त्यामुळे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन घेता येणे शक्य नसल्याने अधिवेशन पुढे करण्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच राष्ट्रपती निवडणूक झाल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यायाबाबत देखील चर्चा सुरू होती.

हेही वाचा -BMC Election : ओबीसी आरक्षणामुळे पुन्हा नव्याने लॉटरी, वंचितांना मिळणार पुन्हा एकदा संधी

ABOUT THE AUTHOR

...view details