मुंबई -पावसाळी अधिवेशनाचे ( Monsoon session ) कामकाज निश्चित वेळेत करण्यासाठी उद्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीने बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य उपस्थित राहणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्ष नेतेअजित पवार ( Ajit Pawar ) आमदार जयंत पाटील ( MLA Jayant Patil ) यांना सदस्य करून घेतला असून यांना आमंत्रण देण्यात आले आहे. तर, काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना सदस्य करण्यात आले आहे. तर, तेथेच भारतीय जनता पक्षाकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) हे सदस्य आहेत. मात्र एकनाथ शिंदे गट, शिवसेना असे दोन गट असल्यामुळे यामध्ये नेमका कोणाला सदस्यत्व द्यायचं असा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. त्यामुळे उद्या दुपारी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला कोण दोन सदस्य उपस्थित राहणार यासाठी एकनाथ शिंदे गट, शिवसेना यांच्यामध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
Monsoon Session : कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवरून शिवसेना शिंदेगटात रस्सीखेच - Working Advisory Committee meeting
पावसाळी अधिवेशनाचे ( Monsoon session ) कामकाज निश्चित वेळेत करण्यासाठी उद्या विधिमंडळ कामकाज सल्लागार पावसाळी अधिवेशनाचे ( Monsoon session ) कामकाज निश्चित वेळेत करण्यासाठी उद्या विधिमंडळ समितीने बैठक बोलावली आहे. मात्र एकनाथ शिंदे गट ( Eknath Shinde group ) , शिवसेना ( Shiv Sena ) असे दोन गट असल्यामुळे यामध्ये नेमका कोणाला सदस्यत्व द्यायचं असा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) आमदार जयंत पाटील ( MLA Jayant Patil ) यांना सदस्य करून घेतला असून यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदे गटाकडून पत्र -उद्या होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला एकनाथ शिंदे गटातील आमदारांना सदस्यत्व देऊन त्यांना आमंत्रित करण्यात यावं. असं पत्र एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar ) यांना देण्यात आल आहे. अद्याप ते दोन सदस्य कोण हे मात्र गुलदस्त्यातच आहेत. तसेच विधानसभेत संख्याबळानुसार एकनाथ शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता असल्याने त्यापैकी दोन सदस्यांना सदस्यत्व मिळण्याची दाट शक्यता आहे.