मुंबई - राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत ढगाळ आकाशासह मुसळधार पाऊस पडण्याची ( Mumbai monsoon 2022 prediction ) शक्यता आहे. नैऋत्य मान्सून आज १९ जून २०२२ रोजी गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात मान्सून पुढे सरकला आहे. १९ जूनला संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आला आहे, पण अजून तो हवा तसा पडला ( Maharashtra rain updates ) नाही.
राज्यात मान्सूनचे आगमन झाले ( Maharashtra Monsoon Update ) असले, तरी मोठ्या पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. राज्याला पुरेशा पावसाची प्रतिक्षा आहे. अनेक जिल्ह्यांत पावसाअभावी पेरणी रखडल्या ( Monsoon news today Maharashtra ) आहेत. मुंबईत ( Mumbai rain update ) पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठा कमी होऊ लागला आहे. सध्या धरणामध्ये जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणी साठा आहे.
विदर्भात पावसाने चांगलीच हजेरी-विदर्भात पावसाने चांगलीच हजेरी ( Maharashtra Weather update ) लावली आहे. अमरावती जिल्ह्यातही धो-धो पाऊस बरसला आहे. रविवारी ( 19 जून ) पहाटे झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येणाऱ्या शिरजगाव कसबा गावात पाणी शिरले. त्यामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ ( heavy rain in amravati district ) उडाली. पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शिरजगाव कसबा या गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. गावातील रस्त्यांवर नदी सारखे पाणी वाहत होते. गावालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.
पावसाचा भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याला फटका (Monsoon impact on cricket )-रविवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका ( IND vs SA 5th T20 ) यांच्यातील खेळला जात असलेला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द केला ( 5th T20 abandoned due to rain ) आहे. सामन्याच्या अगोदर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही संघात नाणफेक पार पडली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामना सुरु होण्यापूर्वी पावसाला सुरुवात झाल्याने सामना सुरु होण्यास विलंब झाला होता.