मुंबई - खैराणी रस्त्याजवळ दुर्गानगर कंपाऊंडमध्ये मंगळवारी रात्री पैशाच्या वादातून एका तरुणाची चाकूने हल्ला करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शाहीद अमीन शेख (वय.32, रा. खैराणी रोड सकिनाका) असून याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.
पैशाच्या क्षुल्लक कारणावरून एकाची चाकूने भोसकून सकिनाक्यात हत्या हेही वाचा -हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक होते हे क्रांतिकारक, भगतसिंगांच्याआधी चढले फासावर
अटक आरोपी फिरोज खान उर्फ राजू बटला (वय 29 रा. खैराणी रोड सकिनाका) याने मृत शाहीद खान यांच्यावर 17 तारखेला रात्री उशिरा चाकूनी सपासप वार केले. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांच्या मदतीने शहीद खान याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खोलवर चाकूचा मार लागला असल्याने तेथे डॉक्टरांनी तपासून शेख यांना मृत घोषित केले. या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.
हेही वाचा -घाटकोपरमधील 'श्रीजी' टॉवरला आग, २० जणांची सुखरुप सुटका
गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांना आरोपी लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर सहा तासाच्या आत परिसरातील एका टॅम्पोत लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक तपास साकिनाका पोलीस करत आहेत.