मुंबई- भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कम्बोज ( BJP Leader Mohit Kamboj ) यांनी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ( Shivdi Metropolitan Magistrate Court ) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मालिक ( Minister Nawab Malik ) यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली लावण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी झालेल्या याचिका दरम्यान मोठ्या प्रमाणात समर्थक गोळा केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी याचिका मोहित कम्बोज यांनी दाखल केली होती.
Consolation to Nawab Malik : मोहित कम्बोज यांची याचिका न्यायालयाने फेटाळली - नवाब मलिक यांच्याविरोधातील याचिका फेटाळली
शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ( Shivdi Metropolitan Magistrate Court ) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मालिक ( Minister Nawab Malik ) यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली लावण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी झालेल्या याचिका दरम्यान मोठ्या प्रमाणात समर्थक गोळा केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी याचिका मोहित कम्बोज यांनी दाखल केली होती.
![Consolation to Nawab Malik : मोहित कम्बोज यांची याचिका न्यायालयाने फेटाळली मोहित कम्बोज-नवाब मलिक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13947357-thumbnail-3x2-malhar.jpeg)
मोहित कम्बोज-नवाब मलिक
पोलिसांनी घेतली नाही दखल -
नवाब मलिक यांनी समर्थक गोळा करून कोरोना नियमांची, प्राकृतिक आपदा अधिनियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच संबंधित पोलिसात तक्रार करून सुद्धा पोलिसांनी दखल घेतली नाही, असा आरोप याचिकेत होता. त्यानुसार भादवी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.