मुंबई- मुंबईतील मोहम्मद अली रोड येथील परिसरात कोरोना रुग्ण आढळला आहे. मुंबई महानगरपालिका व पोलिसांकडून मोहम्मद अली रोड परिसर सील करण्यात आलेला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करणारे फलक महापालिकेने लावले आहेत. असे असूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत.
Corona: प्रशासनाने मोहम्मद अली रोड परिसर सील करुनही बेशिस्त नागरिक रस्त्यावर - संचारबंदी
देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत असून मृतांचा आकडा ही वाढत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन काम केले जात आहे. मात्र, कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

Corona: प्रशासनाने मोहमद अली रोड परिसर सील करुनही बेशिस्त नागरिक रस्त्यावर

पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केले आहे. संचारबंदी असतानाही बऱ्याच ठिकाणी बेशिस्त नागरिक हे घराबाहेर पडत आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.