मुंबई -देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रकल्प असलेल्या देशातील पहिल्या अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम भूसंपादन न झाल्याने बुलेट ट्रेन प्रकल्प रखडत होता. मात्र आता या प्रकल्पाचा कामाला राज्यात गतीने मिळण्यास सुरुवात झाली. नुकताच नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपरेरेशने वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) ते कल्याण शिळफाटा या २१ किलाेमीटर लांबीच्या भुयारी मार्गाकरीता निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत मार्च २०२२ असणार आहे.
महाराष्ट्रात फक्त ३१ टक्के भू-संपादन -
देशातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेला अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाटची प्रक्रियेला रखडली होती. त्यामुळे या प्रकल्पाचा कामाला उशीर होत होता. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून १५५.७६ किमी, गुजरात ३८४.०४ किमी तर दादरा-नगर हवेलीमध्ये ४.३ किमी मार्ग जाणार आहे.हा प्रकल्प पुर्ण कऱण्यासाठी सुरुवातीची अंतिम मुदत २०२३ होती, परंतु यासाठी ७५ टक्के भूसंपादन आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्रात फक्त ३१ टक्के तर गुजरातमध्ये ९७ टक्के आणि दादरा-नगर हवेलीत १०० टक्के भूसंपादन झाले आहे. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात एकूण ४३२.६७ हेक्टर जमिनीची गरज असून आतापर्यंत नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला सरकारी व खासगी मिळून १३४.३१ हेक्टरच जमीन घेतली आहे. मात्र आता अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचा कामाला राज्यात गतीने मिळण्यास सुरुवात झाली. नुकताच नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपरेशने वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) ते कल्याण शिळफाटा या २१ किलाेमीटर लांबीच्या भुयारी मार्गाकरीता निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत मार्च २०२२ असणार आहे. या भुयारी मार्गाची खाेली २४ ते ४० मीटर आणि व्यास १३.१ मीटर असणार आहे. हा बाेगदा साडे तीन वर्षात पुर्ण करण्यात येणार आहे.