मुंबई -मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. हे मोदींना माहिती असूनही ते लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करत असल्याची टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सुधारणांच्या विरोधात नसून सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन कायदे कराण्यात यायला हवे होते, असेही ते म्हणाले.
नवाब मलिक यांची प्रतिक्रिया दोघांतील फरक मोदींनी समजून घेतला पाहिजे -
शरद पवार यांनी कृषी सुधारणेला कधीही विरोध केला नाही. याकरिता मॉडेल कायदा तयार करण्याची तयारी त्यांनी कृषीमंत्री असताना केली होती. आज जे तीन कायदे करण्यात आले. ते समवर्ती सूचीत मोडत असताना केंद्रसरकारने मॉडेल कायदा केला नाही. राज्यसरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन त्यांनी हे कायदे पारित केले. त्यामुळे कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे, यातील फरक मोदींनी समजून घेतला पाहिजे. कायद्यांच्या सुधारणेविरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नसून लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. मात्र, तसे न करता कायदे रेटण्याची भूमिका पंतप्रधान करत असतील किंवा सरकार करत असेल, तर ते योग्य नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा - नव्या एफडीआयपासून देशाला वाचविले पाहिजे, परदेशी सेलिब्रिटींना मोदींचा टोला