महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोदींनी १६ कोटी तरुणांना बेरोजगार केले : काँग्रेचे प्रभारी एच के पाटील यांचा आरोप - Politics of religion from BJP

सत्तेत आल्यानंतर दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले मात्र, आठ वर्षात १६ कोटी लोकांना बेरोजगार ( Modi made 16 crore youth unemployed ) करण्याचे काम मोदी सरकारने केल्याची टीका काँगेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी ( HK Patil in charge of Congress ) केली.

Modi made 16 crore youth unemployed
मोदींनी १६ कोटी तरुणांना बेरोजगार केले

By

Published : Apr 24, 2022, 9:03 PM IST

मुंबई : केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, गेल्या आठ वर्षांमध्ये जवळपास १६ कोटी लोकं बेरोजगार झाली ( Modi made 16 crore youth unemployed ) असल्याची टीका त्यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी केली. तरुणांना नोकऱ्या तर दिल्या नाहीच. मात्र तरुणांना बेरोजगार करायचं काम या सरकारने केले असल्याची टीका पाटील यांनी ( HK Patil in charge of Congress )केली.

कुणाल राऊत यांचे पदग्रहण : युवक काँग्रेस पदाचा पदभार राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांनी स्वीकारला. दादरमधील कामगार कल्याण मैदानात हा सोहळा पार पडला. यावेळी कॉंग्रेस प्रभारी एस के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, काँग्रेस नेते कन्हैया कुमार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या पदभार ग्रहण सोहळ्याला उपस्थित होते. कुणाल राऊत आणि युवक काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीने यावेळी पदभार स्वीकारला. राज्यामध्ये सुरू असलेले जाती-धर्माचे राजकारण बाजूला ठेवून काँग्रेस शाहू, फुले, आंबेडकर या थोर पुरुषांनी दिलेला विचार लोकांमध्ये अधिक तीव्रतेने रुजेल. तसेच धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली समाजात तडे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मशिदीवरील लाऊडस्पीकर, हनुमान चालीसा पठण असे मुद्दे जाणून-बुजून समाजात तेडे निर्माण करण्यासाठी आणले जात असल्याचं मत यावेळी कुणाल पाटील यांनी व्यक्त केले. दादरच्या टिळक भवनात पदभार स्वीकारल्यानंतर कामगार कल्याण मैदानात आपल्या भाषणात त्यांनी हे मत व्यक्त केले.

काँग्रेस नेत्यांची केंद्रावर टीका : केंद्राच राजकारण दुर्दैवी आहे. भविष्यकाळात हे राजकारण दुर्दैवी राजकारण म्हणून ओळखला जाईल अशी अशी टीका यावेळी भाषणादरम्यान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न उभे राहिले आहेत. त्या विरोधात युवक काँग्रेसला काम करावे लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून म्हणाले. तर राज्यात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. जाती धर्माच्या नावाने तरुणांची माथी भडकवण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केला जातोय. यातून विरोधी पक्षाला नामोहरम करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाषणातून केली.

आपापसातल्या संघर्ष बाजूला सारून जनतेत जा :जनतेला खोटे स्वप्न दाखवून केंद्रात मोदी सरकार आले. केंद्र सरकारने घेतलेले अनेक चुकीचे निर्णय जनतेसमोर तरुणांनी पुन्हा एकदा ठेवले पाहिजेत. यासाठी नवनिर्वाचित युवक काँग्रेसच्या कमिटीने आपापसातले मतभेद विसरून हे काम सुरू करण्याचे आवाहन नाना पटोले यांनी यावेळी आपल्या भाषणातून केले. भाजपाकडून आता धर्माचा राजकारण सुरू झाल आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपकडून त्याचा प्रत्यय दिला. धर्माच्या नावाखाली समाजाला एकमेकांच्या विरोधात उभा करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असल्याची टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.

हेही वाचा : Ajit Pawar : भान ठेवा, उचकवण्याचं काम करू नका : अजितदादांनी टोचले राणांचे कान

ABOUT THE AUTHOR

...view details