मुंबई :कृषी कायदे(FarmLaws) मागे घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) घोषणेचे शिवसेना खासदार संजय राऊत(Snjay Raut) यांनी स्वागत केले आहे. सात वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधानांनी जनतेचा आवाज ऐकला. मात्र यासाठी चारशे शेतकऱ्यांना बलिदान(Farmers Protest) द्यावे लागले हे दुर्दैवी आहे असेही राऊत म्हणाले.
राजकीय भयातून कायदे मागे घेतले, तरीही अभिनंदन; संजय राऊत यांचा टोला तर शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते
जर एक वर्षापूर्वी हे ऐकलं असतं तर शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. पण तेव्हा राजकारण केलं आणि आज कायदे मागे घेतले. पंजाब आणि उत्तर प्रदेश मधील निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता आहे म्हणूनच हे कायदे मागे घेतल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्यांना अतिरेकी म्हटले गेले. शेतकऱ्यांवर अन्याय झाला. पण कायदा मागे घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे असे राऊत म्हणाले.
राजकीय भयातून निर्णय
या कायद्यांवरून सरकारची भूमिका आडमुठी होती. लाखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडले गेले. मात्र देशातील जनतेचा शेतकऱ्यांना पाठिंबा होता. राजकीय भयातून हे काळे कायदे मागे घेतले गेले. 13 राज्यांतल्या पोट निवडणुकीत पराभव झाला त्यामुळेच सरकारने आता निर्णय घेतला आहे. आधी पेट्रोलवरचे पाच रुपये का होईना कमी केले आणि आता कायदे मागे घेतले. हा शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा विजय आहे असे राऊत म्हणाले.
राहुल गांधी, पवारांच्या नेतृत्वात विरोधक एकत्र
दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व एकत्र आले. या कायद्यांना तीव्र विरोधाची भूमिका घेतली असे राऊत म्हणाले. याच प्रमाणे जनतेच्या रेट्या तीन काळे कायदे मागे घेतले, तसेच त्यांना भविष्यात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणांचा गैरवापरही थांबवावा लागेल असे राऊत म्हणाले.