महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mobiles Stolen During Local Train Journey : रेल्वे प्रवासात चोरीला गेलेले हजारो मोबाईल 'या' राज्यात झाले ट्रेस; लोहमार्ग पोलिसांची माहिती

मुंबईत लोकल रेल्वे प्रवासात ( Local train ) चोरीला गेलेले प्रवाशांचे मोबाईल ( Mobiles Stolen ) हे उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये चोरट्यांकडून विकले जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी ( Railway Police ) दिली आहे. २०१८ ते २०२१ या कालावधीत चोरीला गेलेले एकूण चार हजारांहून अधिक मोबाईल उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये झाले ट्रेस झाले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jan 31, 2022, 10:41 PM IST

मुंबई- लोकल रेल्वेतील ( Local train ) गर्दीचा फायदा घेऊन दररोज ५० पेक्षा जास्त मोबाईल चोरीचा घटना घडत असतात. मात्र, हे मोबाईल जातात कुठे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण, याचा आता मुंबई लोहमार्ग पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबईत चोरीला गेलेले मोबाईल ( Mobiles Stolen ) हे उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये चोरट्यांकडून विकले जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी ( Railway Police ) दिली आहे. २०१८ ते २०२१ या कालावधीत चोरीला गेलेले एकूण चार हजारांहून अधिक मोबाईल उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये झाले ट्रेस झाले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक मोबाईल ट्रेस -रेल्वे प्रवासात किंवा रेल्वे स्थानकांवर मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांचा तपास लावताना मुंबई लोहमार्ग पोलिसही निरनिराळ्या युक्त्या लढवत आहेत. मात्र, तरीही मोबाईल चोरट्याच्या लोहमार्ग पोलिसांना मुसक्या आवळत्या आल्या नाहीत. रेल्वेने चोरी गेल्या मोबाईचा शोध लावण्यासाठी एक पथक नेमले आहे. त्यानुसार, चोरी गेलेल्या मोबाईला ट्रेस केले जात आहे. रेल्वे पोलिसांच्या पथकाने २०१८-२०२१ दरम्यान चोरीला गेलेले चार हजार १०३ मोबाईल शोधून काढले आहेत. म्हणजे या ४ हजार १०३ मोबाईला पोलिसांनी ट्रेस केले आहेत. ज्यामध्ये मुंबईसह राज्यात ४२४ मोबाईल सापडले. उर्वरित ३ हजार २८१ सध्या देशातील इतर राज्यांमध्ये वापरात आहेत. सर्वाधिक ट्रेस झालेले आणि वापरात असलेले मोबाईल उत्तरप्रदेशमध्ये आहेत. येथे एकूण एक हजार १०२ मोबाईल ट्रेस केले आहेत. तसेच बिहारमध्ये ४४२ आणि पश्चिम बंगालमध्ये ४४१ चोरीचे मोबाईल ट्रेस झाले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

मोबाईल पुनर्प्राप्त करण्यासाठी विशेष पथक -विशेष म्हणजे मोबाईल चोर वेग-वेगळी पद्धत अवलंबत असल्याचे पोलिसांकडून समजते. पूर्वी फटका गँगची लोकल प्रवाशांमध्ये दहशत होती. मात्र, पोलिसांनी या गॅंगला उधळून लावण्यात यश आले आहेत. तरीही मोबाईल चोरीच्या घटना कमी झाल्या नाहीत. या चोरांना पकडण्यासाठी लोहमार्ग पोलीस ( Railway Police ) खबऱ्यांचीही खूप मदत घेत आहे. मोबाईल चोरणारे सराईत गुन्हेगार असतात त्यांच्या नोंदवहीचीही मदत घेतली जात. याशिवाय आता लोहमार्ग पोलीस विकल्या जाणाऱ्या चोरीचे मोबाईल ट्रेस करून त्याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत 4 हजारांहून अधिक मोबाईल ट्रेस करण्यात पोलिसांना यश मिळाले आहेत. हे मोबाईल पुनःर्प्राप्त करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. यासह मोबाईलच्या पुनःर्प्राप्तीसाठी विशेष निधीची व्यवस्था केली आहे. या पथकाला मोबाईल पुनःर्प्राप्तीसाठी त्या-त्या राज्यांना भेटी देण्याची सुरूवात केली आहे.

या राज्यात ट्रेस झाले मोबाईल -उत्तरप्रदेश एक हजार 102, बिहार 442, पश्चिम बंगाल 441, महाराष्ट्र 424, मुंबईत 398, कर्नाटक 242, गुजरात 205, आंध्र प्रदेश 189, तामिळनाडू 178, मध्य प्रदेश 150, राजस्थान 108, ओडिशा 40, दिल्ली 48, हरियाणा 28, पंजाब 27, केरळ 21, जम्मू आणि काश्मीर 19, आसाम 19 आणि उर्वरित राज्यामध्ये 12, असे चार हजार 103 चोरी गेलेले मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी शोधून काढले आहेत.

मोबाईल चोरी गर्दीच्या वेळी -मोबाईल आणि पाकीट चोरीचे गुन्हे हे सर्व साधारणपणे सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे ऐन गर्दीच्या वेळीच घडतात. त्यामुळे आम्ही या वेळेत जास्तीत जास्त सतर्क राहतो. मुंबईत दररोज ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक स्थानकावर बारीक लक्ष ठेवून असतो. प्रवाशांनीही आपल्या मोबाईल सहित आपल्या साहित्यावर विशेष लक्ष ठेवावे. प्रवाशांनी शक्यतो दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलणे टाळावे, असे आवाहन लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'चा माध्यमातून केले आहेत.

  • काय काळजी घ्याल..?
  1. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधगिरी बाळगा.
  2. लोकलच्या डब्यात दारात उभे राहून बोलणे टाळावे.
  3. लोकलमध्ये चढताना-उतरताना कधीच मोबाईलवर बोलत उतरू अथवा चढू नये.
  4. लोकलच्या दारात व्हॉटसअॅप चॅट करू नये.
  5. लोकल प्रवास करताना आपल्या साहित्याची काळजी घ्यावी.
  6. प्रवास करताना चारही बाजू लक्ष असू द्या.
  7. लोकलमध्ये हेडफोन लावून झोपू नका.
  8. दुसऱ्याला मोबाईल देऊ नका.

हेही वाचा -Central Railway : मध्य रेल्वेने माेजले १२१ काेटी रुपये; कुर्ला-परळ पाचवी-सहावी मार्गिकेचा अडथळा दूर

ABOUT THE AUTHOR

...view details